✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर :– काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते आमदार मा. विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे, शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले आणि काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या एकसंघ प्रचार रणनीती, परिश्रम आणि नागरिकांच्या काँग्रेसवरील भक्कम विश्वासामुळेच हे शक्य झाले असून येणाऱ्या काळात चंद्रपूर जिल्हात काँग्रेस याच पद्धतीने जनसेवेच्या कामात हिरिरीने सहभागी राहून चंद्रपूर शहर आणि जिल्ह्य़ातील जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तथा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील असा विश्वास जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी काँग्रेसच्या बाजूने जनतेने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल चंद्रपूर शहरातील तसेच जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले आहेत.









