संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-आदिवासी विकास संस्था महामंडळ कडून सन २०२४ २५ मधे खरेदी केलेले हजारो क्विंटल धानाची शासनाने उचल न केल्यामुळे पेंढरी ,जारांवडी , कसनसुर घोटसुर परिसरातील धान्य उघड्यावर पडून आहेत त्यामुळे सदर खरेदी केलेल्या धानावर गुरे-ढोरे , डुकर ताव मारत असुन हजारो क्विटंल धानाची नासाडी होतांना दिसत आहे. याला जबाबदार कोण आदिवासी विकास महामंडळ कि आविस व्यवस्थापक !
आदिवासी भागामधे विविध ठिकाणी आविस कडून लाखो क्विटंल धान खरेदी केलेत परंतु सदर भागात धान्य साठवण करण्याकरीता गोदाम नाही त्यामुळे संबंधित व्यवस्थापकाने पावसाळ्यात फाटक्या ताळपत्र्या धानावर झाकुन ठेवल्या त्यामुळे पावसाळ्यात हजारो क्विटंल धान सडले यातच सहा महीने लोटूनही महामंडळाने धानाची उचल न केल्यामुळे व व्यवस्थापकांनी धानाचा योग्य पाहणी राखणदार नसल्यामुळे जारावंडी कसनसुर घोटसुर परिसरातील धानावर गुरे ढोरे डुकरे ताव मारून धान फस्त करीत आहेत यातही यावर्षीची धान खरेदी अजुनही सुरु झाली नाही त्यामुळे जुन्या धानाची नुकसान होत आहे.









