✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
माथा:-कोरपणा तालुक्यातील शिवाजी हायस्कूल, माथा, जि. चंद्रपूर येथे शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम‘ या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमास शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. वाघाडे सर तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. टेकाम सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व समजावून सांगत, “प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली, तर भविष्यात हरित आणि प्रदूषणमुक्त भारत घडविणे शक्य होईल,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. वृक्षारोपणानंतर सर्वांनी लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प केला.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणारा आणि समाजात हरित संदेश देणारा ठरला.

















