प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती/वरोरा : एसटी बसमध्ये दिव्यांगांसाठीचे राखीव आसन न देणे, अपमानास्पद वर्तन करणे आणि बस क्रमांकाबत दिशाभूल केल्याचा आरोप करत पत्रकार तथा 59% दिव्यांग मनोज रामदास मोडक यांनी वरोरा आगार व्यवस्थापक उत्कर्षा चौधरी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
‼️मोडक यांनी तक्रारीत म्हटले की, दि. 18 जुलै 2026 रोजी भद्रावती ते नागपूर प्रवासादरम्यान वाहक सी. के. हनवते यांनी राखीव आसन देण्यास नकार दिला. उलट उद्धटपणे बोलून जिवे मारण्याची धमकी दिली. एका महिला प्रवाशाने जागा दिल्यावरच त्यांना बसता आले.
👉तसेच तिकीटावर “MH-5820” क्रमांक असताना प्रत्यक्ष बसचा क्रमांक “MH-40/CS-3990” असल्याचे छायाचित्रासह पुरावा दिला आहे. प्रवासादरम्यान वाहक खर्रा खात असल्याचा व्हिडिओही सोबत जोडला आहे.
💢व्यवस्थापकांनी तक्रार स्वीकारून चौकशीचे आश्वासन दिले. मोडक यांनी संबंधित वाहकावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करावे आणि दिव्यांग प्रवाशांच्या हक्कांसाठी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे.















