✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-गडचिरोली जिल्हयातील आदिवासींच्या जमीनी जबरजस्तीने आदिग्रहन होवू देणार नाही. यासाठी कांग्रेस आपले रक्त साडे पर्यंत लढा तिव्र करेल.चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा गडचिरोली तालुक्यातील राखी गुरवळा व हिरापूर येथील कास्तकारांच्या जमीनी इतरत्र कंपण्या जबरजस्तीने आदिग्रहण करीत आहेत. आदिवासीच्या जमीनीची विक्री होत नसनांना रातोरात सात बारा दुसऱ्यांच्या नावाने कशी होत आहे याचे आश्चर्य वाटतो. याचा लेखा जोगा आमचे नेते राहुल गांधी यांचेकडे सांगु असे कांग्रेसचे आदिवासी नेते विश्रांत जी भुरीया यांनी पत्रकार परिषदेत माहीती दिली.

पत्रकार परिषदेला कांग्रेसचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके आमदार रामदास मसराम कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. विश्वजित कोवासे माजी अधक्ष महेंद्र बाम्हणवाडे , माजी उपाध्यक्ष मनोहर पाटिल पोरटी आदिवासी नेत्या कुसुमताई अलाम शालीक धोराम ,पंकज गुंडेवार ‘ नगरसेवक शतीश विधाते बडू शनीवार प्रा. शमशेर खॉन पठाण आदि उपस्थित होते.
आम्ही विकासाच्या विरोधात नाही विकास झाला पाहीजे. विमानतळसाठी आमचा विरोध नाही परंतु आदिवासीच्या जमीनी बळकावून घेणे योग्य नाही. जल जंगल जमीन मुळ आदिवासींच्या हक्काची आहे. हे जर जात असेल तर आदिवासी कडे काहीच राहणार नाही ते दुसरीकडे पलायन करतील तेव्हा हे होता कामा नये यासाठी कांग्रेस पार्टी मोठा लढा उभारेल असेही अखिल भारतिय आदिवासी कांग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत जी भुरीया यांनी पत्रकार परिषदेत माहीती दिली.















