⏭️युवकांच्या बळावर संघटना अधिक सक्षम करू; जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष कायम – अरुणभाऊ धोटे
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-समाज भवन, रामनगर, राजुरा येथे युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीदरम्यान युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटन विस्तार, युवकांची भूमिका आणि आगामी कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी दिल्ली ते गल्ली पर्यंत संघटनात्मक विरिष्टांचे संदेश सांगितले व राजुरा विधान सभा अध्यक्ष उमेश गोनलवार यांनी आढावा दिला

💢यावेळी राजुरा शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी रोशन लांडे, राजुरा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निरंजन मंडल तसेच राजुरा तालुका एनएसयूआय अध्यक्षपदी सुजल वाढई यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजुरा काँग्रेसचे शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, नगरसेवक एजाज अहमद, प्रणय लांडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात अरुणभाऊ धोटे म्हणाले, काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि जनतेचा विश्वास अधिक बळकट करण्याची जबाबदारी युवकांच्या खांद्यावर आहे. संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देत गावागावात काँग्रेसचे जाळे मजबूत करणे हे आपले ध्येय आहे. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी युवक काँग्रेसने कायम संघर्षशील भूमिका घ्यावी. नव्या पदाधिकाऱ्यांनी पदाचा सन्मान राखत प्रामाणिकपणे संघटन वाढीसाठी आणि समाजहितासाठी काम करावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विविध जनआंदोलनांमध्ये युवकांची भूमिका निर्णायक ठरेल, असा मला विश्वास आहे.
बैठकीच आयोजन राजुरा तालुका युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले, बैठकीला मधुकर झाडे, सरपंच सुरज माथनकर, तालुका उपाधयक्ष रवी करमंकर, श्रीनिवास, रणजित पिंपळकर यांच्यासह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रम, सदस्य नोंदणी अभियान, युवकांशी संवाद, तसेच जनतेच्या स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत नियोजन करण्यात आले.















