✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-रिपब्लिकन पार्टी तालुला शाखा गडचिरोली व बामसेफच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ जुलै २०२६ ला शासकिय विश्राम गृह गडचिरोली येथे आरापिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणुन बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे मारोती भैसारे लवकुंश भैसारे सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम रामटेके मिलिंद अंबादे प्रमोद देवतळे एटापल्ली महिला आघाडी प्रमुख संघमित्रा राजवाडे निशाताई बोदेले विशाखा देवतळे मनोहर चलाख आदि लाभले होते.


याप्रसंगी निट परिक्षा प्रकरणी शहिद झालेल्याना श्रध्दांजली वाहण्यात आली या प्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सांगीतले की ऑगष्ट महिण्यात रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी जिल्हयातील तमाम रिपाईच्या कार्यकत्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन बोरकर यांनी केले. तर भोजराज कान्हेकर म्हणाले की एक मंत्री बदलवून होणार नाही तर संपुर्ण व्यवस्था बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांचा सुद्धा राजीनामा घेण्याची गरज आहे.
सदर बैठकीला मदन उराडे मोरेश्वर निमगडे नुर्फनाथ भैसारे व्हि. के बाबनवाडे नेताजी मेश्राम रोशन उके जिवन मेश्राम किशोर मेश्राम नरेंद्र शेन्डे योगराज रामटेके नामदेव दुधे माधव वैघ धनराज पाझारे जैराम उंदिरवाडे दामोधर शेन्डे राजु वनकर अशोक अंबादे कुरखेडा भिमराव गोंडाणे नाजुक भैसारे चेतन हेडावू पाकी भैसारे लता रामटेके प्रेमलता कान्हेकर वासुदा शेख दुशिला रामटेके ज्योती मेश्राम लिलाबाई वाकडे देवालाबाई शेन्डे दर्शना वणीकर अहिलाबाई सहारे शशीकला सहारे अरुणा उंदिरवाडे निता उंदिरवाडे आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद राऊत तर आभार अरविंद गजभिये यांनी मानले.















