✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-रियॉन्स सोसल एक्टीव्हिटी गडचिरोली तर्फे आज दि. २५ जुलै २०२६ ला एकादशी निमित्य इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे हजारो नागरिकांना ज्युस व फळाचे वाटप सामाजिक बांधिलकी जोपासली.रियॉन्स प्राव्हेट लिमिटेड हि सामाजिक संघटना असुन नागरिकांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे त्यामुळे सदर संघटनेतर्फे किडनी सुगर बिपी च्या रोग्यांना स्वस्त दरातऔषधी सुध्दा विकत देण्याचे कार्य सदर संघटना करीत असतो.सदर सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते ज्युस व फळाचे वाटप करतांना नौशद अल्ली सय्यद , किशोर मेश्राम पुरुषोत्तम रामटेके नाजुक लटारे गोकुळ चंदेल सुरेखा लटारे बिना सय्यद सोनी मोहुर्ले रेखा मुनघाटे रजनी डोंगरे व इतर कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून सहकार्य केले.














