✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील माडेमुलची प्राथमिक शाळा व अंगणवाडीत जातांना वर्ग १ ते ४ च्या चिमुकल्या विध्यार्थांना पाण्यातुन व चिकल तुडवित जावे लागते एवढे घाणीचे साम्राज असतांना सुध्दा ग्रामपंचायत माडेमुल च्या सरपंच व ग्रामसेवकांचे दुर्लक्ष असल्याचे दिसते.
माडेमुल प्राथमिक शाळेच्या व अंगणवाडीच्या पंटागणात चिखलाचे व पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळेत जाणारे चिमुकले चिखल तुडवित जात असतात. अश्या वातावरणात मुलांना आरोग्या पासुन धोका निर्माण होवू शकतो सदर प्रकार हा पावसाळ्यात दरवर्षी निर्माण होतो परंतु सदर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांचे नेहमीच दुर्लक्ष असतो तेव्हा सदर प्रकरणा संबधी ग्रामसेवकांनी तातडीने उपाय योजना करावी चिमुकल्या मुलांच्या जिवनासी खेळू नये अशी मागणी माडेमुल गावकर्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचेकडे केलेली आहे.













