✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11 वे राष्ट्रीय महाधिवेशन 7 आगस्ट 2026 रोजी ज्ञानज्योती ऑडिटोरियम, डॉ. मनमोहन सिंग सिटी, युनिव्हर्सिटी बेंगळूरु (कर्नाटक राज्य ) येथे आयोजित करण्यात आले आहे. या महाधिवेशानाला गडचिरोली ज़िल्ह्यातून जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे यासाठीची नियोजन बैठक आज 22 जुलै रोज बुधवारला जगतगुरू तुकाराम महाराज सार्वजनिक वाचनालय कन्नमवार वार्ड गडचिरोली येथे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा शेषराव येलेकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी महासंघाचे ज़िल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कार्याध्यक्ष रामकृष्ण ताजने, सचिव सुरेश भांडेकर, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, संजय ढाकुलकर, वाचनालायचे अध्यक्ष पांडुरंग नागापुरे, दादाजी चापले महिला अध्यक्ष मंगला कारेकर, सचिव नम्रता कुत्तरमारे आदी मंचावर उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना शेषराव येलेकर यांनी सांगितले की, ओबीसी महा अधिवेशनाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे हस्ते होणार आहे असून देशातील विविध राज्यातील मंत्री,खासदार,आमदार, ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी सांगितले. ज़िल्हाध्यक्ष दादाजी चुधरी यांनी महाधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास 300ओबीसी बांधव जाणार असल्याचे सांगितले यावेळी पांडुरंग नागापुरे, संजय ढाकुलकर यांनी सुद्धा सभेला मार्गदर्शन केले.
बैठीकीचे संचालन रामकृष्ण ताजने तर आभार सुरेश भांडेकर यांनी मानले. बैठकीला देवानंद कामडी, सुरेश लडके, घनश्याम जकुलवार राजेंद्र उरकुडे, सागर म्हशाखेत्री,शंकर चौधरी, विठ्ठल कोठारे, वामन गुरनुले, विजय कुत्तरमारे, विजय गिरसावळे, मंगला खरे, प्रा संध्या येलेकर, प्रा. विद्या म्हशाखेत्री देवला बानबले, रेखा चुधरी, कविता दोनाडकर, प्रभाकर दोनाडकर, संध्या शिवणकर, मेघा उरकुडे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.














