✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-आरमोरी -दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आज आरमोरी येथे विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि भाजपविरोधी पक्षांच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन आंबेडकरी युवा संघर्ष समिती व माकपा पक्षाचे जिल्हा महासचिव अमोल मारकवार आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनाला आरमोरी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरमोरी बंदला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये (कॉलेज) बंद ठेवण्यात आली. विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार, आरमोरी यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा संघटनेचे कार्यकर्ते, प्रतीक रामटेके, संप्रति मेश्राम, स्वप्नील बन्सोड, सिद्धांत मेश्राम जगदीश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते जयकुमार मेश्राम, डॉ. प्रदीप खोब्रागडे, आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, निशांत वनमाली, राजु गारोडे, राजेंद्र बुल्ले, रमेश मेश्राम, काळीराम गायकवाड, अक्षय बागडे, वासुदेव अंबादे, कुमता मेश्राम, किरण बांबोळे, लता इंदूरकर, ज्योती उंदीरवाडे, कुसुम डोंगरे, विजय सुपरे, विद्या चौधरी, अर्चना मारकवार, लता डोकरे, यांच्यासह विविध संघटनांचे शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे अस्वीकार्य असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली.













