⏩वडकी पोलिसांनी दोन वाहनांचा पाठलाग करीत त्यांना ताब्यात घेऊन 68 जनावरांची मुक्तता केली यात पोलिसांनी 73 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.वडकी पोलीस स्टेशनचे हद्दीतून एम एच 40 एके 39 33 या क्रमांकाच्या ट्रक मधून 26 गोवंश नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग करीत | सदर ट्रक वडकी हद्दीतच ताब्यात होती या सर्व जनावरांना ताब्यात घेऊन गोरक्षण कडे पाठविण्यात आले आहे. याच घटनेच्या पाठोपाठ दुपारी युपी 21 एचई 73 98 क्रमांकाचा कंटेनर बेचाळीस गोवंश घेऊन कत्तली साठी हैदराबाद कडे जात असताना याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी तात्काळ चौफेर नाकाबंदी केली आणि हा कंटेनर देवदरी घाटामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने कंटेनर न थांबविता पांढरकवड्या कडे वळविला त्याच वेळी पोलिसांनी वाय पॉइंटवर हा ट्रक पकडण्याची तयारी ठेवली असताना या ट्रकचा चालक आणि इतर लोक पळून जात असताना पथकातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत त्यांना पकडले दरम्यान या ट्रक मधून 42 गोवंश नेले जात होते, ही सर्व जनावर ताब्यात घेतल्यानंतर यातील तीन बैल मृत अवस्थेत आढळले, जिवंत असणाऱ्या सर्व जनावरांना गोरक्षण संस्थेकडे पाठविण्यात आले एकूण पोलिसांनी 68 जनावर ताब्यात घेतली त्यापैकी पाच जनावर मृता अवस्थेत मिळाली उर्वरित सर्व जनावरांना गोरक्षण संस्थेकडे पुढील व्यवस्थेसाठी पाठविले . पोलिसांनी दोन्ही वाहन आणि जनावर असा 73 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला तर या तीन आरोपींना अटक केली यात शहा आलम मोहम्मद फारुख वय वर्षे 32 राहणार भोजपूर उत्तर प्रदेश, शाहरुख अली वय वर्ष 29 राहणार मेरठ उत्तर प्रदेश, सरताज कल्लू वय वर्ष 35 राहणार कुंदरकी तालुका मुरादाबाद उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे या सर्व आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल केले असून अटक करण्यात आली आहे.