संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली

चामोर्शी: -सुशीला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा यांच्या वतीने दिनांक 17/01/2026 रोज शनिवारला जि. प. प्राथ. शाळा निकतवाडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन शिबिराचे उदघाटक सौ.रुपाली दुधाबावारे सरपंच ग्रामपंचायत घोट, शिबिराचे अध्यक्ष विशाल दहिवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती घोट अध्यक्ष,गोकुळदास वाकडे सुशीला बहुउद्देशीय संथा अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वर्षा शेट्टे ग्रामपंचायत सदस्य घोट, वर्षा नेवारे ग्रामसंघ महिला बचत गट निकतवाडा,प्रदीप वाकडे बौद्ध समाज सचिव निकतवाडा,वनिता पोरेड्डीवार ग्रामपंचायत सदस्य घोट, उर्मिला पोगुलवार माजी तंटामुक्ती अध्यक्ष घोट,सीताराम बारसागडे प्रतिष्ठित नागरिक निकतवाडा,डॉ आशुतोष जावडेकर यांची उपस्थिती होती. शिबिराची सुरवात द्विप्रज्वलन करून करण्यात आली. पाहुण्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव प्रियंका शेंडे यांनी केले. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि ती जपण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रस्ताविकेतून सांगितले. व्यासपीठावरील मान्यवरानी भाषणातून उपस्थित नागरिकांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करत असे शिबीर समाजासाठी अत्यंत उपयुक्य असल्याचे सांगितले
या आरोग्य शिबिरासाठी बाहेरून आलेल्या तज्ञ् डॉक्टरांच्या टीम ने सहभाग घेतला. डॉ. आशुतोष जावडेकर दंत शैल्य चिकित्सक, डॉ आकरे सर वैद्यकीय अधिकारी,डॉ. प्रांजय हर्ष,नेत्र तज्ञ् गडचिरोली,नागेश मादेशी समुपदेशक (icic) व त्यांच्या सहकारी वैद्यकीय पथकाने रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, डोळे तपासणी, दंत तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली शिबिरात 118 नागरिकांनी तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरात चहा, नास्ता व तपासणी साठी आलेल्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
या यशस्वी शिबिरासाठी सुशीला बहुउद्देशीय संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ व गावातील दिलीप खोब्रागडे, मुरलीधर देवतळे, खुशाल खोब्रागडे, आकांशा डोंगरे, स्मिता खोब्रागडे, संध्या वाकडे जोसना खोब्रागडे छब्बू फुलझेले, सविता खोब्रागडे, पलक वैरागडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप खोब्रागडे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन खुशाल खोब्रागडे यांनी यांनी मानले .







