संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:–गडचिरोली तालुक्यातील पोर्ला गावातील एका दारुड्याने दारू पिण्यास पैसे देत नाही म्हणुन पत्नीला पेट्रोलने पेटवुन दिल्याची मागील महिण्याची घटनेत उपचारदरम्यान पत्नीचा मृत्यु झाला.
पोर्ला येथील शुशील बारसागडे हा मजुरीचे काम करायचा परंतु त्याला दारूचे व्यसन जुळल्याने तो पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागायचा व तिला मारहान करायचा १६ डिसेंबर २०२५ रोजी शुशीलने पत्नीकडे दारू पिण्याकरीता पैसाची मागणी केली व दारू पिऊन पत्नीला अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले प्रियंका शुशील बारसागडे ५०% टक्के जळाल्यामुळे तिला नागपुर येथील शासकिय रुग्णालयात भरती करण्यात आले होते उपचार दरम्यान दि. २० जानेवारी २०२६ ला उपचार दरम्यान प्रियंकाचा मृत्यु झाला. पिडिताच्या वडीलांनी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे दिलेल्या रिपोर्टनुसार आरोपी शुशील चिंटुजी बारसागडे यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेमुळे पोर्लात एकच खळबळ उडाली तिचे दोन मुले आईविना पोरकी झाली.








