संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
गडचिरोली:-पोर्ला जवळील नवरगांव येथील नुतन ग्रामपंचायत
लोकार्पण सोहळा माजी सभापती मारोतराव ईचोडकर माजी उपसभापती विलास दशमुखे यांचे हस्ते पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन गडचिरोली प .स चे बिडिओ नितिन पाटिल सरपंच सुनंदा देशमुखे उपसरपंच आशाताई भोयर सदस्य उमाकांत चुधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापुजी फरांडे कृष्णा जांभुळकर विस्तार अधिकारी देवारे ,राजेंद्र थोरात जांभुळकर आदिची उपस्थिती होती
याप्रसंगी माजी उपसभापती विलास दशमुखे म्हणाले की नवरगांव येथील जुन्या इमारतीत जागा उपुरी होती त्यामुळे आमच्या पाठपुराव्याने या गावात ग्रामपंचायतला नविन इमारत मिळाली गावाचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
याप्रसंगी माजी सभापती मारोतराव ईचोडकर बिडिओ पाटिल आदिचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमास नवरगांव येथील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.








