✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:– भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजुरा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी भवन, गांधी चौक येथे सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०७:३० वाजता ध्वजारोहणाचा भव्य व राष्ट्राभिमानाने परिपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा ध्वजारोहण सोहळा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. राष्ट्रध्वज वंदनानंतर राष्ट्रगीताच्या सूरात परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.

यावेळी प्रजासत्ताक दिन हा संविधानिक मूल्यांचे स्मरण करून देणारा ऐतिहासिक दिवस आहे. लोकशाही, समानता, सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकतेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच संविधानाचे रक्षण आणि जनतेच्या हक्कांसाठी लढत राहील, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केले.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष दिनकर कर्नेवार, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अँड. सदानंद लांडे, अँड. अरूण धोटे, सभापती विकास देवाळकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, अभिजीत धोटे, अशोकराव देशपांडे, साईनाथ बतकमवार, सय्यद सकावत अली, डॉ. उमाकांत धोटे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, जिल्हा उपाध्यक्ष सुरजभाऊ ठाकरे, नगरसेवक अनंता ताजने, एजाज अहमद, पुणम गिरसावळे, इंदूबाई निकोडे, संद्या चांदेकर, निता बानकर, फरीना सय्यद, कविता उपरे, यांच्यासह काँग्रेसच्या विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.








