संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली – रमाई महिला मंडळ इंदाळा च्या वतीने राष्ट्रमाता रमाई जयंती महोत्सव शनिवार दि. ७ फरवरी २०२६ ला रात्रौ ८ वाजता स्व. एकनाथ चौधरी यांच्या आवारात इंदाळा मुक्कामी आयोजित करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. संजय मेश्राम डायरेक्टर , स्टिल स्टार मार्केटिंग गडचिरोली तर उदघाटक रविंद्र डोंगरे संचालक गडचिरोली तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे नगरसेवक बाळू ढेंभुर्णे आरपिआय चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर डॉ. धम्मदिप बोदेले , मिलिंद भानारकर , सामाजिक कार्यकर्ता नवनाथ उके , सरपंच संजय निखारे शेकाफे चे पंडित मेश्राम वंचितचे जि. के. बारसिंगे प्रतिक बारसिंगे सरपंच राजु उंदिरवाडे गोंगाव आदि लाभणार आहेत.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन अरुण शेंन्डे करणार असुन रात्रौ १० वाजता संघर्ष भगत व संच यांचा भिम – बुद्ध गिताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असुन सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रमाई महिला मंडळ इंदाळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे.👇👇👇👇👇👇👇








