संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
सिरोंचा:-छल्लेवाडा येथील काही नागरिक मेडाराम येथे देवदर्शना साठी गेले होते. देवदर्शन करून परतिच्या प्रवासानंतर एका ट्रक ने बोलोरा गाडीला धडक दिल्यामुळे बोलोरा गाडी चालक गंभीर जखमी झाला तर नऊ लोक गंभीर जखमी झाले त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र भुमणपाली येथे भरती करण्यात आले.
बोलोरा गाडी नंबर 33 A 3955 व ट्रकची टक्कर झाली या भिषण अपघातात बोलोरा गाडीचा चेंदामेंदा झाला तर बोलोरा चालक वसंत चव्हाण गंभीर जखमी झाला. तातडीने मदतकार्य मिळाले त्यामुळे नऊ लोकांना ग्रामीण रुग्णालय भुपणपाली येथे भरती करण्यात आले.








