संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगांव ( भोसले ) येथील ग्रामपंचायत मधील 26 जानेवारी २०२६ च्या कार्यक्रमात ग्रामसेवकांनी चुकीच्या पद्धतीने राष्ट्रध्वज फडकाविला त्यामुळे ग्रामसेवक ग्रामपंचायत पिंपळगांव भोसले यांचेवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अनिल वामन नंदेश्वर पिंपळगांव यांनी संवर्ग विकास अधिकारी ब्रम्हपुरी यांचेकडे केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की 26 जानेवारी २०२६ च्या प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगांव ( भोसले ) येथील कार्यक्रमात सदर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी राष्ट्रध्वज खालून झेंड्याला बांधलेला राष्ट्रध्वज वर नेऊन फडकाविला. वास्तविक राष्ट्रध्वज फडकविण्याच्या पूर्वी झेंड्याला वर बांधुनच फडकावयाचा असतो असा नियम असतांना ग्रामसेवक म्हणतो मी दरवर्षी खालून वर नेऊनच राष्ट्र ध्वज फडकावितो हा राष्ट्रध्वजाचा अपमान असुन ग्रामसेवक ग्रामपंचायत पिंपळगांव ( भोसले ) यांचेवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अनिल नंदेश्वर यांनी बिडिओ ब्रम्हपुरी यांचेकडे केलेली आहे.








