संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब येथील अमोल उंदिरवाडे यांच्या जंगलातून टाकाकु लाकडापासून बनविलेले काष्ठशिल्प अनेक प्रदर्शनातून कौतुक केले जात असुन त्यांच्या काष्ठशिल्पाची विविध स्तरावरून मागणी वाढली आहे. या युवकाने काष्ठशिल्प बनविण्याचा छंद आता त्याच्या जीवनाचा आधार बनला आहे.

💢💢अमोल ने आपल्या कलागुणातून बनविलेले काष्ठशिल्प केवळ गडचिरोली पार पडलेल्या कृषी प्रदर्शनीतच नाही तर मुंबई , दिल्ली , गोवा , नागपूर येथे पार पडलेल्या कृषी प्रदर्शनीत सुद्धा अमोलच्या काष्ठशिल्याचे कौतुक केल्या गेले. खेडयात राहून १२ वी शिकलेला अमोल नोकरीच्या मागे न लागता आज काष्ठशिल्प च्या कमाईतुन आपले उदरनिर्वाह करतो. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी प्रदर्शनीतुन अमोल चे काष्ठशिल्प बघुन अमोल चे कौतुक केले व त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. त्यांच्या काष्ठशिल्याला सलाम.









