संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली जिल्हयातील आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली जिल्हयातील संपूर्ण धान खरेदी केंद्रावर सन २०२४-२५ चे कोट्यावधी पोत्यातील धान सडत आहेत. शासनाच्या जाचक अटिमुळे धान उचल करणारे मिलिंगवाल्यांना धानाची उचल करण्यास अडचणी जात आहेत. याकडे जिल्हयातील तिनही आमदारांचे दुर्लक्ष असु शेतकरी अडचणीत आले आहेत.
शासनाच्या जाचक अटी अश्या
मिलिंग वाल्यांच्या गाडीचा RC बुक PUC , इन्सुरन्स , लायसन्स गाडीचा फिटनेस शर्टफिकेट लोडींग गाडीचा फोटो (नोट कॅम्प) लोडींग गाडी राईस मिल पर्यंत पोहण्याचा लोकेशनचा फोटो धान मिलिंग होताच तांदुळ गोदामात पोहचविणे आदि जाचक अटीचे परिपत्रक शासनाचे असल्यामुळे राईस मिलर मालक धानाची उचल करण्यास तयार होत नाही. त्यातही रस्ते खराब डिप एरिआ त्यामुळे जिल्हयातील अनेक धान केंद्रावरील माल सडत आहेत-शासनाने धानाची उचल न केल्यामुळे सन २०२६ मधे माल ठेवण्याकरीता जागा नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्हयातील अनेक धान केंद्र बंदच आहेत. अनेक कास्तकारांवर कर्ज आहे धानाची विक्रीच नाही तर शासनाचे कर्ज कसे फेडायचे अशा प्रश्न निर्माण झाला आहे . जवळच्या छत्तीसगड राज्यात मात्र धान खरेदी करताच धानाची उचल केल्या जाते मग महाराष्ट्रात का नाही !
देशाचा पोसिंदा कास्तकार आज अडचणीत सापडला असतांना जिल्हयातील खासदार – आमदार आवाज उठवतील काय ? अशा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.‼️









