संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
एटापल्ली:-एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत जारावंडी नेहमीच कुलपबंद असतो ग्रामसेवक मुख्यालयी सोडाच परंतु महिन्यातून दोन चार वेळा येतात व लवकर गडचिरोली राहते घरी निघुन जातात त्यामुळे कास्तकार , शाळकरी विद्यार्थी यांचे कामे वेळवर होत नाही कर वसुली होवूनही नाल्या साफ राहत नाही त्यामुळे डासांचा प्रार्दुभाव वाढला असुन गावात रोगराई पसरण्याचे चिन्ह दिसत आहेत याला सर्वश्री जबाबदार ग्रामसेवक आहेत अशी ओरड जारावंडी नागरिकांची असुन जारावंडी येथील नागरिक बेताल यांनी कळविले असुन ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहावे अशी मागणीही एटापल्ली संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली.
ग्रामपंचायत जारावंडी हे महत्वाचे गाव असून एटापल्ली तालुक्यापासून कोसोदूर असल्यामुळे बिडिओचे दुर्लक्ष तर होत नसावे ना ! किंवा ग्रामसेवक मुख्यालयी न राहण्यासाठी बिडिओला चिरमिरी मिळत तर नसावी ना ! सदर प्रकार अतिदुर्गम अनेक ग्रामपंचायतीचा असुन सदर बाबीकडे बिडिओ प.स.एटापल्लीने लक्ष देण्याची गरज आहे.👇👇👇👇









