संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
पेंढरी:-धानोरा तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायतचे सरपंच पवन येरमे यांनी स्वतः च्या खर्चाने रुग्णवाहीनी
ग्रामपंचायत पेंढरी ला भेट दिली त्याचा फायदा केवळ पेंढरी गावकऱ्यांनाच नव्हे तर पेंढरी परिसरातील ४० गावातीलअनेक रुग्णाला व्हावे व बिमार रुग्णाला तातडीने सामान्य रुग्णालय गडचि रोली भरती करता यावे रुग्णाचे प्राण वाचावे हाच उद्धांत हेतु ठेवून सरपंच येरमे यांनी जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहीणी ग्रामपंचायत पेंढरीला भेट दिली व सदर रुग्णवाहीनीचे लोकार्पण सोहळा पार पडला.
पेंढरी सारख्या आदिवासी परिसरात सरपंच पवन येरमे यांनी रुग्णाच्या सेवेसाठी आपल्या स्वः खर्चाने
ग्रामपंचायत पेंढरी ला रुग्णवाहिणी भेट लोकार्पण सोहळा माजी जि.प सदस्य श्रीनिवास बुल्लमवार किरण सेडमेक बँकेचे मॅनेजर त्रिपुरवार , आदिवासी सहकारी सोसायटी चे उपेंद्र नाईक ग्रामसेवक छगन खुणे ग्रामपंचायतेचे कर्मचारी व पेंढरीचे गाव करी उपस्थित होते.








