जन्मदिनी वृक्ष भेट देऊन वृक्षारोपणास दिले प्रोत्साहन : युवक काँग्रेसच्या सामाजिक उपक्रमाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु अजय धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बल्लारपूर शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील ग्रामीण रुग्णालय व विविध शासकीय कार्यालयात जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वृक्ष भेट देऊन वृक्षारोपणाचा सामाजिक संदेश दिला. वाढदिवसानिमित्त वृक्ष भेट दिल्याने आणि वृक्षारोपण करण्याचा संदेश दिल्याने अनेक मान्यवरांनी व नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.👇👇👇
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश बावणे, बल्लारपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेश आनंद, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते रोहित चुटे, लक्ष्मण यादव, रोहित आमटे यांच्यासह बल्लारपूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









