✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :– विवेकानंद नगर, राजुरा येथे स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था, राजुरा यांच्या वतीने श्री. संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. याच प्रसंगी राजुरा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अरुण धोटे, उपाध्यक्ष दिलीप डेरकर, नगरसेवक सिद्धार्थ पथाडे, मंगला मोकडे, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील सेवाभावी मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सर्व सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये श्री विनोद भाऊ कोंगरे, सुनीलजी राजापुरे, अमित गजानन पाटील, अजयजी पारधे यांच्यासह दोन शाळांचे मुख्याध्यापक व स्थानिक देवस्थानचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.
यावेळी सन २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून नामदेव पेचे यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा नगरपरिषद अध्यक्ष मा. अरुणभाऊ धोटे होते. त्यांनी सत्कार स्वीकारताना सामाजिक, धार्मिक उत्सवातून नव्या पिढीवर नैतिकता आणि सांस्कृतिक मुल्यांची जोपासना करण्याचे उत्तम संस्कार होतात त्यामुळे अशा उपक्रमांतूनच एका उत्तम समाजाची जडणघडण होते असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विनोद भाउ कोंगरे, सुनिलजी राजापुरे आणि भाउजी पोटे, सृजनजी पारोघे, बाबुराव झटाले यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवून त्यांचार सत्कार करण्यात आला. कार्यकमाला संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्यगण उपस्थित होते. त्यात उपाध्यक्ष मा. निरज मत्ते, सचिव मा. बाळा गोहोकर, मा. विनोदजी कोंगरे, मा. विठोबाजी तेलंग, मा. विलासजी चापले, मा. गजाननजी गुल्हाने, मा. किशोरजी सातपुरे, मा. किशोरजी ठामके, मा. देविदासजी डांगे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात सकाळी ६ वाजता काकड आरतीने झाली. त्यानंतर ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. दुपारी श्री संत गजानन महाराज व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. संध्याकाळी सत्कार समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रथम श्री संत गजानन महाराज, संत तुकडोजी महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव मा. बालाजी गोहणे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. बंडूजी भोयर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री अशोकजी पिंपळकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वि करण्याकरिता ग्वमासियांनी हिरिहिरीने सहभाग घेवून कार्यक्रम यशस्वी केला यामध्ये मा. बंडुभाउ रोगे, प्रकाशजी विधाते, मोहनजी कडु, नंदकिशोर पाचघरे, बोबडेजी, कोंतमवारजी, संगमवार साहेब, अविनाशजी जेनेकार, प्रकाशजी बेले, विजयजी नांदुरकर, दिलिपजी लंगडे, यादवरावजी मटाले, समाधानजी लगडे, ज्ञानेश्वर मडावी, नामदेवरा उरकुडे, योगेद्र अमृतकर, अमित सातपुते, केवलदास तोडे, नागोबाजी कुळमेथे, विकास मेंदुलकरसर, गिरमाजी सर, रमेशजी, गणेशजी चौधरी, धानोरकरजी, रामकृष्ण पाचभाई, प्रा. बोबडे जी, झिबल पा. बोबडे, आदी समस्य ग्रामवासीय मान्यवर उपस्थित होत.









