✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-बौद्ध धम्मीय उपवर वधू परिचय मेळावा रानी दुर्गावती कन्या विद्यालय येथे उत्साहात संपन्न झाला . या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक प्रा . मुनिश्वर बोरकर आरपिआय जिल्हाध्यक्ष , भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , प्रमोद राऊत सचिव बहुजन मुक्ती पार्टी ,रत्नघोष नान्होरीकर चेतन इंटरप्राइजेस, चोखोबा ढवळे , नेताजी मेश्राम होते .
या मेळाव्याचे आयोजन माता रमाई बुद्धिझम परिणय ब्रम्हपूरीचे घनश्याम रामटेके ,रमेश बागडे , धर्मप्रकाश शेंडे , विवेक मेश्राम , पंढरीनाथ आडे यांनी केले.
भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष म्हणाले की , आजच्या धकाधकीच्या युगात माणसातील संपर्क कमी झाले . त्यामुळे अशा मेळाव्याचे आयोजन करणे आवश्यकआहे . घनश्याम रामटेके संस्थेचे मुख्य आयोजक म्हणाले की , संपूर्ण विदर्भात हजारो उपवर वधुंचे लग्नाचे जुळवाजुळ करुन देण्यात आले . या मेळाव्याला दोनशेच्या वर उपवर वधु उपस्थित होते .
या मेळाव्याला शामराव बारसिंगे , भैयालाल भैसारे, प्रशांत वानखेडे , मिलींद शेंडे , स्वप्निल अलोणे , अनिल कुकडकर, विशाल भानारकर , संघम शेंडे , सचिन देशकर , सुजित भानारकर , पुजा दुर्गे , अंजली ठवरे , कोमल बांबोळे , कोमल सोनापूर , दिक्षीत नंदागवळी , मृनाली भानारकर , प्रज्ञापाल कांबळे , संकल्प कांबळे , स्नेहा सिंदे , पल्लवी जुमळे आदि बहुसंख्य उपवर वधु उपस्थित होते .








