३५ रक्तदात्यांनी बजावली सामाजिक जबाबदारी; आमदार संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती
✍️दत्तात्रेय बोबडे
वणी
वणी:-महाशिवरात्रीचे औचित्य साधून जनहितदक्ष बहुउद्देशीय संस्था तर्फे रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी चारगाव चौकी या गावी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ३५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. नागपूर येथील लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे रक्त संकलित करण्यात आले.
💢कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे संचालक श्री. संजय खाडे, जनहितदक्ष संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकेश भोयर, संस्थापक श्री. प्रशांत बोबडे, शिवब्रिगेडचे संस्थापक श्री. सतीश मालेकर आणि जनहितदक्ष संस्थेचे श्री. धनंजय भोयर, चारगांव चे सरपंच श्री शंकर वालकोंडे उपसरपंच सौ नीलिमाताई बोदाडकर प्रशांत बोधाडकर तंटामुक्त अध्यक्ष श्री महेश वैद्य श्री धनराज साळवे श्री पवन मालेकर सुधाकर लांडे विलास जी खुसपुरे श्री दत्ता बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार संजय देरकर यांनी जनहितदक्ष संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, ग्रामीण भागात अशा प्रकारे शिबिरे आयोजित केल्यामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनहितदक्ष बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शिबिरादरम्यान प्रत्येक रक्तदात्याचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. ग्रामीण भागातील रक्तदात्यांनी दाखवलेल्या या उत्साहाबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.








