✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-अंधश्रध्दा निर्मूलन समिती गडचिरोली जिल्हा व जिल्ह्यातील संपूर्ण आश्रमशाळा तील अंधश्रध्दा निमुर्लनाच्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा सुरु असुन यात महाराष्ट्र निर्मुलन समितीचे राज्यकार्यकारीणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर प्रा. मुनिश्वर बोरकर जिल्हाध्यक्ष अंधश्रध्दा निर्मुलन समिती गडचिरोली विनायक रामटेके उपाध्यक्ष महाअंनिस मुल , दशरथ साखरे , भैय्यासाहेब भैसारे मारोती भैसारेआणि खेमराज हस्ते आदिची टिम जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मुलनाचा कार्यक्रम घेत आहेत.
गेल्या तिन दिवसात आश्रम शाळा रांगी , चांदाळा , कारवाफा , पेंढरी सोडे , मुरुमगांव , भाकरोंडी , कुरंडी , एंगलखेडा ,सोनसरी , पोटेगांव , इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळा गडचिरोली ,मुरमाडी , परसवाडी , सुकाळा , अरंततोंडी , गिरोला , वडेगांव ‘गठ्ठा , वैरागड अड्याळ चामोर्शी आदि शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर विशेष जानिव जागृती , विद्यार्थांमधे विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी व सामाजिक क्रुरप्रथा पासुन त्यांचे स्वरक्षण व्हावे हा एक कार्यक्रमाचा उद्देश होता काही चमत्कार दृश्य सुद्धा विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले यात रामभाऊ डोंगरे व प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येक कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.








