संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-भारत मुक्ती मोर्चा (बामसेफ ) ची देशव्यापी विशाल महारॅली RRS मुख्यालयावर नागपूर येथे दि. 22 फरवरी २०२६ ला नेण्यात येणार असुन सदर महारॅली बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे.
RSS व BJP ने कटक येथील बामसेफच्या अधिवेशनास परवानगी नाकारल्या बाबत. भारताचे संविधान व लोकशाहीचे रक्षक करण्याबाबत. संविधानाची शपथ घेतलेले सरकार अजुनही संविधानाचे उल्लंघन करीत आहे त्यांच्या विरोधात सदर महारॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
होवू घातलेल्या महारॅलीत गडचिरोली जिल्ह्यातून बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर सहयोगी आरपीआय पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर भारत मुक्ती मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत यांच्या नेतृत्वात२०० कार्यकर्त सहभागी होणार असल्याचे डोमाजी गेडाम , प्रेमदास रामटेके यांनी कळविले आहे.








