संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-हातपंप देखभाल दुरस्ती कामगाराचे मानधान वाढवावे जवळच्या जिल्ह्यातील हातपंप दुरस्ती कामगाराचे मानधान १७ हजार रुपये व गडचिरोली जिल्हयातील हातपंप कामगाराचे मानधान फक्त १० हजार रुपये हा दुजाभाव का ? तेव्हा गडचिरोली जिल्हयातील हातपंप दुरस्ती कामगारांचे मानधान शासनाने . वाढवावे व आमच्यावरील अन्याय दुर करावा व ईतर मागण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील १०० च्यावर हातपंप देखभाल दुरस्ती कामगार जिल्हा परिषद गडचिरोली समोर बंमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत.
हातपंप देखभाल दुरस्ती कामगार सन १९८६ पासुन जि.प अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागात अल्पशा मानधानावर काम करीत असुन चंद्रपूर – गोंदिया जिल्ह्यातील कामगारांना १७ हजार मानधान मिळत असुन मात्र गडचिरोली जिल्ह्यातील हातपंप दुरस्ती कामगारांना फक्त १० हजार रुपये हा दुजाभाव का ? तेव्हा गडचिरोली जिल्ह्यातील कामगारांच्या मानधानात वाढ करावी ह्या मागणीसाठी निलकंठ साखरे , गुरुदेव कुमरे , देविदास दुर्गे , पोचन्ना चेवुला , जनार्धन गावतुरे सहीत एकंदरीत ६० हातपंप कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. सदर हातपंप देखभाल ब दुरस्ती कामगार संघटना संलग्न आयटक असल्यामुळे आयटकचे देवराव चवळे , प्रकाश ढलाल , अलीलखॉ पठाण , निलकंठ साखरे आदि कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली हातपंप संघटना उपोषणाला बसले आहेत.








