मूल:-तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यात तेल्लापूर या गावात सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची 7 फेब्रुवारी 2026 ला दिवसा ढवळ्या विटंबना करण्यात आली. हे कृत्य अतिशय निंदनीय असून ही बाब केवळ करोड लोकांची भावना दुखावणारे नाही तर सामाजिक समता ,शिक्षण व मानवतावादी विचारधारेवर थेट आघात आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढून देशातील सर्वांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला. त्या काळातील अनिष्ट चालीरीती रूढी परंपरेवर प्रहार करून सती प्रथा, बालविवाह, विधवांच्या अत्याचाराविरुद्ध संघर्ष करून शेतकरी ,शेतमजूर ,कामगार तसेच वंचित घटकांना संघटित करून सामाजिक क्रांती घडवून आणली. आणि समता मूलक समाज निर्माण केला. अशा महान समाजसुधारकाच्या पुतळ्याची विटंबना करून देशात सामाजिक तेढ निर्माण करून देशामध्ये अशांती पसरवण्याचा समाजकंटकाकडून आणि विकृत विचारधाराअसलेल्या लोकांकडून हे कृत्य घडले. या घटनेत सहभागी असलेल्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी व यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी उपाय योजना करावी. तसेच त्याच ठिकाणी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा भव्य पुतळा सन्मानपूर्वक स्थापन करावा, अशी मागणी निवेदनातून केंद्रिय गृहमंत्री माननीय नामदार अमितभाई शहा यांच्याकडे करण्यात आली. याप्रसंगी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांच्या नेतृत्वात माननीय तहसीलदार मूल यांच्या मार्फतीने पाठविण्यात आले. याप्रसंगी महिला कार्याध्यक्ष सौ शशिकलाताई गावतुरे, महासचिव श्री. गंगाधर कुनघाडकर, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार, भाजपा मुल शहराध्यक्ष प्रवीण मोहुलें, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राकेश ठाकरे, समता परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार युवराजजी चावरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाअध्यक्ष प्रा. किसन वासाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक पुलावार, नगरसेवक तुकाराम गुरनुले, नगरसेविका सौ. अश्विनी निकोडे, माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे, पत्रकार राजेंद्र वाढई, पत्रकार कु. कुमोदिनी भोयर, समता परिषदेचे शहराध्यक्ष राकेश मोहुलें, श्री. गुलाब शेंडे, जिल्हा महिला संघटिका सौ.सीमा लोनबले, सौ. तेजस्विनी नागोसे, सौ. शामलताई बेलसरे, सौ.ज्योती गुरनुले, सौ. गीता निकुरे, सौ. उषा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते- निलेश राय, धम्मदीप गौतम, प्रमोद निमगडे, नरेश शेंडे, प्रज्योत रामटेके प्रा. केवल कराडे, प्रा. प्रभाकर धोटे, प्रा. दिलीप वारजुरकर, प्रा. सुधीर नागोसे, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, चिमढा सरपंच कालिदास खोब्रागडे, उपसरपंच योगेश लेनगुरे, माजी उपसरपंच भारत वाळके, मा.उपसरपंच गुरुदास ठाकरे, इंजि.रुपेश निकोडे, सुरज मांदाळे, देविदासजी मशाखेत्री, सत्यवान मोहुलें, परशुराम शेंडे, माधवराव सोनुले, मोहम्मद रफीक शेख, रमेश बोरुले, अंबादास बोरुले, राजेंद्र मोहुर्ले, राजेश गुरनुले, रामकृष्ण कावळे, पंकज लोनबले, पी. एम. लोनबले, तसेच समता परिषदेचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








