✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने अंधश्रद्धा निर्मुलनाचा कार्यक्रम आश्रम शाळा गुडांपल्ली येथे मुख्याध्यापक ‘बी.बी दास यांचा अध्यक्षतेखाली तर अनिस केंद्रिय सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर अनिस जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर अनिसचे विनायक रामटेके चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोना विरोधी कायदा या विषयावर विशेष जानिव जागृती ,विद्यार्थ्यामधे विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी व सामाजिक क्रुरप्रथा पासुन त्याचे संरक्षण व्हावे हा कार्यक्रमाचा उद्देश होता यावर रामभाऊ डोंगरे यांनी मार्गदर्शन केले व काही प्रात्यक्षिक करून दाखविले.

कार्यकमास के. एन मुलकलवार ‘ एस . आर आईचवार व्ही .टी मेंडारकर आक्केवार मॅडम ‘ पि .एस पिल्लारे सहीत शाळेचे कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते








