✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:– राजुरा शहरातील आझाद चौक येथील अल बरकत मंजिलमध्ये राहणाऱ्या अंसारी कुटुंबातील सर्वात लहान मुलगी रिमशा रफीक अंसारी हिने अवघ्या ५ व्या वर्षी रमजान २०२६ चा पहिला रोजा ठेवून आदर्श निर्माण केला आहे. इतक्या लहान वयात रोजा ठेवून रिमशाने अल्लाहची इबादत केली तसेच देशात शांतता व सौहार्द नांदावे यासाठी प्रार्थना केली. मनापासून केलेली प्रार्थना अल्लाह नक्की ऐकतो असे रिमशाचे मत आहे.
रिमशाला इबादतीची प्रेरणा तिच्या नानीजान, आई आणि वडिलांकडून मिळाली. तिच्या पहिल्या रोज्याबद्दल कुटुंबीय तसेच राजुरा परिसरातील नागरिकांकडून तीचे कौतुक होत असून आनंद व्यक्त करीत तिला अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत.💢💢💢💢💢








