✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
सिरोंचा:-सिरोंचा तालुक्यातील शासकिय आश्रम शाळा बामणी (व्येंकटापुर ) येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती (दाभोळकर ) जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक आर. ए . सुटे यांचे अध्यक्षतेखाली तर मार्गदर्शक अनिस राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर गडचिरोली जिल्हा अनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर अनिस चंद्रपूर जिल्हाचे विनायक रामटेके आदिचे मार्गदर्शन लाभले तर जादुटोणा विरोधी प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविण्यात आले. विद्या र्थ्यामधे विज्ञानाची ओढ निर्माण करून अंधश्रध्दा दुर करणे हाच उद्देश ठेवून मार्गदर्शन करण्यात आले .कार्यकमास अधिक्षक मुळे सर , किरण कोंडागुर्ले ‘ साक्षी मडावी ,राजबाबु जंबोजी आदि सहीत शाळेचे विध्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.








