✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम गाव रासपल्ली ( आंबेडकरनगर ) येथील बुद्ध विहारात अनि ।स चा कार्यक्रम घेण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर आरपिआय चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर सामाजिक कार्यकर्ते डॉ. सखाराम झोडे सिरोंचा इजि. विनायक रामटेके चंद्रपूर आदिच्या प्रमुख उपस्थितीत अनिस चा कार्यक्रम पार पडला. बुद्ध विहारात त्रिशरण – पंचशिला ग्रहण केल्यानंतर रासपल्ली गावात अंधश्रद्धा , बुवाबाजी नसल्याचे निदर्शनास आले. जादुटोणा विरोधी कायदा कसा असतो आपल्यावर अंधश्रध्देतूनअन्याय अत्याचार झाला तर आपण संविधानाचा आधार घेऊन पोलीसांच्या सहकार्याने बुवाबाजी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा तर अंधश्रद्धा दुर होईल अश्या प्रकारचे मार्गदर्शन प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले तर अनिसचे सदस्य यांनी जादुटोणा टोंग कसा असतो याबाबत प्रात्याक्षिक करून दाखविले. डॉ. सखाराम झोडे यांनी सर्वाचे आभार मानले.
कार्यक्रमास यशोदा अल्युरी , सुधाकर दहागावकर , चिन्नका अल्लुरी , पोचा दहागावकर , अशोक दुर्गे , मुकुंदा कोडागुर्ले , सोनाली कोडागुर्ले आदि सहीत आंबेडकर नगर (रासपल्ली ) येथील बहुसंख्य धम्मबंधु उपस्थित होते.









