✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
सिरोंचा:-सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम देचली पेठा शासकिय आश्रम शाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा गडचिरोली च्या वतीने अनिस चा कार्यक्रम मुख्याध्यापक व्हि . टी. वासनिक यांच्या अध्यक्षते खाली तर अनिंसचे राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर अनिसचे गडचिरोली जिलाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर सामाजिक कार्यकर्ते डॉ सखाराम झोडे अनिस चंद्रपूर चे विनायक रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. शाळेतील विद्यार्थामधे शिक्षणाची गोडी दिसली नाही तरीही विदयार्थामधे शिक्षणाची आवड निर्माण व्हावी अंधश्रद्धा बुवाबाजी नष्ट झाली पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेच्या अधिक्षिका कु. टि एस. सातपूते पि.एन वाघाडे के एम सयाम आदि सहीत शाळेचे विद्यार्थी बहुसंखेनी उपस्थित होते.








