संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर । गडचिरोली.
गडचिरोली:महाराष्ट् शासनाच्या अंतर्गत प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या सर्व विभागातील लिपीक संवर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दुर करुन सुधारित वेतनश्रेणी लागु करणे व पदोन्नती स्तर कमी करण्यात यावा या मागणीसाठी शासकिय निमशासकिय अधिकारी व कर्मचारी संघटना आरमोरी पंचायत समिती समोर अशोक डहाळे शरद बिरादार आनंद भिसे प्रसिद्धी प्रमुख वंदना ठाकरे सहीत बहुसंख कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.
शासकिय निमसासकिय लिपीक संवर्गाच्या पदोन्नती स्तर कमी करण्यात यावा. २००५ नंतर जुनी पेन्शन बंद केली ती जशास तसी जुनी पेन्शन सर्वांना लागु करावी. या पूर्वी लिपीक संवर्ग बांधवांना रजा साठविली तर त्या खात्यात जेवढया रजा शिल्लक आहेत तेवढी रजा रोखीकरण सेवानिवृत्ती झाल्यानंतर मिळत होते ते पुर्ववत चालू करावे. दिपावली बोनस पुन्हा सुरू करावे. सेवानिवृत्ती वय ५८ वरून ६० करावी. कंत्राटी पद्धत बंद करावी. १२ रजा पुर्वरत ठेवावे. आदि मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शासकिय निमशासकिय अधिकारी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत








