आईवरही जीवघेणा हल्ला करुन गंभीर जखमी केले.
भद्रावतीतील झिंगुजी वॉर्ड हादरला, घरगुती वादातून रक्तरंजित घटना
तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : शहरातील झिंगुजी वॉर्ड येथे मंगळवारी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास घरगुती वादातून थरारक घटना घडली. सख्ख्या भावाने आपल्या अविवाहित बहिणीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिचा जागीच खून केला, तर आईला वाचवण्यासाठी गेली असता तिच्यावरही जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
मृत युवतीचे नाव संजीवनी शंकर भोंडे (वय ३२) असे असून ती अविवाहित होती. आरोपी भाऊ सूरज शंकर भोंडे, (वय २८) रा. झिंगुजी वॉर्ड, भद्रावती याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
माहितीनुसार, कुटुंबातील आई-मुलगी आणि मुलगा-वडील असे वेगवेगळे स्वयंपाक करून राहत होते. मागील काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी किरकोळ कारणावरून — भाजी हिसकावून घेतल्याच्या वादातून — संतापलेल्या आरोपीने सतूरसारख्या धारदार शस्त्राने बहिणीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या संजीवनीचा जागीच मृत्यू झाला. मुलीला वाचवण्यासाठी धावलेल्या आईवरही आरोपीने हात व पायावर वार करून तिला गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. डीबी स्क्वॉडच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
जखमी आईची प्रकृती चिंताजनक असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी








