स्पर्धेला खेळाडूंचा उत्कृष्ट प्रतिसाद
जयेंद्र चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
(भंडारा)- एकविध क्रीडा संघटना व हिंदवी प्रतिष्ठान भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त रेल्वे मैदान खात रोड भंडारा येथील मैदानावर विविध क्रीडा स्पर्धाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दोरीवरील उड्या, १०० मिटर धावणे, बॉल कलेक्शन, पोता दौड, कुस्ती स्पर्धा वयोगट १२ वर्षाखालील, १५ वर्षाखालील (मुले, मुली) १८ वर्षाखालील आणि ओपन गट.प्रथम तीन क्रमांकांना मेडल्स व सर्व सहभागी खेळाडू स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आले. दांडपट्टा प्रात्याक्षिके तसेच ३० किलो वजनापासुन महिला -पुरूष गटासाठी जिल्हास्तरिय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटाला प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना मेडल व सर्व सहभागी खेळाडू स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आले .

बक्षिस वितरण प्रसंगी हिंदवी प्रतिष्ठान भंडाराचे संस्थापक जॅकी रॉवलानी व जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, एकविध क्रीडा संघटनेचे मार्गदर्शक मोहन दाढी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, नगराध्यक्ष मधुराताई मदनकर, उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त मोहन दाढी, एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे, कुस्ती स्पोर्ट ॲकाडमीचे अशोक बन्सोड, एकविध क्रीडा संघटनेचे सचिव सुनिल कुरंजेकर, जिल्हा क्रीडा पत्रकार विलास केजरकर, क्रिष्णा उपरिकर, टेनिकॉईड असोसिएशनचे अरुण बांडेबुचे, गणेश साकोरे, बुधवारी पेठ हनुमान व्यायाम शाळेचे प्रविण लिमजे, आशिक चुटे, नितीन निनावे, नरेश बोंद्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
💢त्यावेळी इविका साखरवाडे हीने छत्रपती शिवाजी महाराज व मॉ. जिजाऊ यांच्या जिवन चारित्र्यावर पोवाडा सादर केला. विविध स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी व जागृत नागरिक तसेच जिल्हा स्तरिय कुस्ती स्पर्धेत ५५ ते ६० महिला – पुरूषांनी सहभागी होऊन स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकविध क्रीडा संघटनेचे सचिव सुनिल कुरंजेकर यांनी केले. प्रास्ताविक एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विलास केजरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक चटप, नशिब उके, आर्या सार्वे, श्रेयश कुरंजेकर, अंशुल बावणे, सुयश ईलमे, दागो भुरे, अशोक गोंडाणे, भुषण नान्हे, यशस्वी मारवाडे, यशस्वी गोंधळे, सृष्टी रोटके, रींकू बडवाईक, एनाक्षी वाकडे, सिमरण भेदे, हेमांशी जगनाडे, यावी वंजारी, प्रियांशी उरकुडे, गुंजन भेंडारकर, सानिया भोपे, सोनाली बन्सोड, आदर्श केवट, सृष्टी निनावे, सुरक्षा मेश्राम, प्रिन्स दमाहे, चेतन माटे, अमित साठवणे, सागर डहारे, मयुर चौधरी, दिपक कांबळे, सोनम पंचबुध्दे, आर्या माटे, चिन्मय सार्वे, रोहन माटे, श्रध्दा शेंडे, हितांश कुथे, दर्श डोरले, आराध्य राऊत, तन्मय ठोमरे, जयेन मस्के, ईलेश भुरे, तनिषा राऊत, जयेश राऊत, यश काटेखाये, प्रेम बोंद्रे, हिमांशू मदनकर, चिन्मय झंझाड, खुशी मुळे, शौर्य कोसरे, विभुष नखाते, पार्थ सार्वे, क्रियान मुटकुरे, स्वरा नखाते, हिमानी हुकरे, श्रिया मुटकुरे, हर्ष कावळे, अदिती सार्वे, सुयोग जांभुळकर, आशिष कांबळे, सोनल नागरिकर, साक्य मेश्राम, हर्षद फंदे, भावना देशकर, लावण्या लांजेवार, हिना गोटेफोडे, नव्या चौधरी, रश्मी बोरकर, शौर्य तिडके, क्रिश चिंचोळकर, कराशु बावणकर आदी विद्यार्थी,विद्यार्थिनींनी सहकार्य केले.








