अहेरी:-अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील शासकिय माध्यमिक तथा प्राथमिक आश्रम शाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती ( डॉ. नरेंद्र दाभोडकर) शाखा गडचिरोली चे वतीने अनिसचा कार्यक्रम पार पडला. यात मुख्याध्यापक एस. बी. मावलीकर यांच्या अध्यक्षतेखाली अनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर अनिसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर अनिस चंद्रपूरचे विनायक रामटेके आदि लाभले होते. अनिसचे राज्यकार्यकारणी सदस्य इंजि. रामभाऊ डोंगरे यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करतांना म्हणाले कीआता अंधश्रद्धा सोडून द्या बिमार पडल्यास डॉक्टरकडे जा यातच तुमचे भवितव्य आहे.वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर विशेष जानिव जागृती , विद्यार्थ्यामधे विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून मार्गदर्शन करण्यात आले तर जादुटोणा बाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले . कार्यक्रमास शाळेचे मुखकाध्यापक एस व्ही भोये अधिक्षिका एस एस सयाम ‘ एस. एन. चिमुरकर पि .एन बोरकर ए पी गेडाम.बोरसे गायकवाडआदिसहीत पेटमिलीआश्रम शाळेचे शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.