जयेंद्र चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
(भंडारा) – साकोली जवळ असलेल्या आलेबेदर येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे फाल्गुन पौर्णिमेनिमित्त दिनांक 2 व 3 मार्च 2026 ला दोन दिवशीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाप्रसंगी भंते महापंथ नागपूर ,पूज्य भंते सुगत , भंते नागदीपंकर ,पूज्य भंते ज्ञानज्योती संग्रामगिरी, भंते सुगंतानंद उत्तर प्रदेश, पूज्य भंते संघ कीर्ती, पूज्य भिकू धम्मचेती , पूज्य भंते कश्यप, पूज्य भिकू दर्शनदिप, पूज्य भिकू नंद पूज्य भिकू विपस्सी, भंते करुणानंद, पूज्य भंते चित्त ज्योती, पूज्य भिकुनी धम्मानंद, पूज्य भंते संघमित्रा, भीखुणी धम्मज्योती, पुज्य भिकुनी रूपानंदा पूज्य भिकुनी धम्मदिना व इतर 70 च्या जवळपास व त्यांचा संघ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे.
दि.3 मार्च रोजी रात्री 8.00 वाजता प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.याप्रसंगी उद्घाटक पाहुणे म्हणून साकोली क्षेत्राचे आमदार नाना पटोले,सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, सभापती शितल राऊत, इंजिनिअर सचिन मेश्राम, विजय नंदागवळी (समता सैनिक दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष), पोलीस निरीक्षक महादेव वाचेकर, तहसीलदार निलेश कदम, सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम ,अचल मेश्राम, अभय बन्सोड, संस्थेचे सचिव रोशन भोवते,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी. जी. रंगारी, उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक मेश्राम,शरद रंगारी, डॉ. अजय अंबादे ,प्रज्ञा दिरबुडे ,नितीन रामटेके व इतरही मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.ह्याप्रसंगी प्रबोधनकार मनोज राजा गोस्वामी यवतमाळ ,आकाश राजा ,सुभाष कोठारे हिंगणा ( नागपूर), भावेश कोटांगले साकोली, आकाश भैसारे, प्रज्ञा कीर्ती, क्रांति मीनल यांचा संगीतमय प्रबोधन कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आलेबेदर येथील संस्थेचे सचिव रोशन भोवते, बौद्ध उपासक दीपक मेश्राम, नितिन रामटेके, डी. जी. रंगारी, भावेश कोठांगले ,प्रज्ञा दीरबुडे, शरद रंगारी , कार्तिक मेश्राम व भिक्खू संघ तसेच इतर बौद्ध उपासक यांनी केले आहे.








