✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना :-इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते.या नोंदीत कामगारांना वेगवेगळ्या सुमारे 32 शासकीय योजनांचा लाभ मिळतो.याच योजनांच्या लाभावर डोळा ठेवून नोंदणीच्या अटी व नियमातील पळवाटांचा आधार घेत गेल्या कित्येक महिन्यांपासून गडचांदूरात बोगस कामगारांची नोंदणी सुरू झाली आहेत.यासाठी संबंधित विभागाचे बोगस शिक्के तयार करून येथील काही दलाल प्रत्येकाकडून 2 ते 3 हजार रुपये घेऊन बोगस नोंदणी करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहेत.कारवाई होत नसल्याने दलाल आणि संबंधित विभाग अधिकाऱ्यांची मिलीभगत तर नसेल ना?असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महाराष्ट्र शासनाने ‘बांधकाम कामगार कल्याणासाठी योजना’ अंमलात आणून कित्येक गरीब बांधकाम मजुरांना दिलासा दिला आहेत.इतरांप्रमाणे या कामगारांना सुद्धा शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा,यांच्या जीवनात सुख समृद्धी यावी,या उदात्त हेतूने महाराष्ट्र सरकारने सदर योजना लागू केली.मात्र,येथे योजनेला हळताल फासले जात असून लाभ खरे व गरजूंना मिळण्याऐवजी ज्यांनी आयुष्यात कधीही घमेले डोक्यावर घेतले नाही, कोणत्याही बांधकामासाठी ठेकेदाराकडे गेले नाही,अशा धनदांडग्यांची कामगार म्हणून बोगस नोंदणी केली जात आहे.ही बाब अत्यंत गंभीर असून ‘2 ते 3 हजार द्या,बांधकाम मजुरांचा लाभ घ्या’ असे पहायला मिळत आहेत.प्रशासनातील काही भ्रष्ट कर्मचारी आर्थिक व्यवहार करून शासनाच्या या योजनेचा बट्ट्याबोळ करत,बोगस नोंदणीला प्रोत्साहन देत लाखोंची कमाई करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत असून यासाठी आपपाल्या परीने दलालांची नेमणूक सुद्धा करण्यात आल्याची चर्चा आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रत्येकी बोगस लाभार्थ्यांकडून 2 ते 3 हजार रुपये घेवून खोट्या व बनावटी तथाकथित ठेकेदारांच्या सह्या,शिक्के मारून त्यांना लाभ दिला जात आहे. यामुळे सदर योजनेपासून खरे लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहेत.”खरे कामगार धुऱ्यावर आणि बोगस कामगार माऱ्यावर” असे यानिमित्ताने म्हटले तर वावगे ठरणार नाही.
“काय आहेत शासनाचे नियम.”
शासकीय नियमानुसार संबंधित कामगारांना भांडी दिली जातात. त्यामध्ये मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार होत आहे.भांड्याची किंमत बाजारात अंदाजे 3 हजार आणि कामगार कल्याण मंडळ कंत्राटदारांना 8 हजार 500 रुपये त्यासाठी देते.अशी माहिती एका कामगार ठेकेदाराने दिली आहे.अधिकाऱ्यांनी फिल्डवर जाऊन त्या कामगारांचा,कामावरच फोटो काढायचा आहे व त्याठिकाणीच सर्व त्यांची कागदपत्रे घ्यायची आहेत.पण अधिकारी नियमाचे पालन करत नाहीत? त्यामुळे सध्या बोगस कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची ओरड सुरू आहे.योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र असलेल्या बांधकाम कामगाराने मंडळाकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे.नोंदणीसाठी लागणारे वयाचे पुरावे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,बैंक,पासबुक,
रहिवासी पुरावा द्यावा लागतो.परंतु तसे न करता दलालांना 2 ते 3 हजार रुपये दिले की,कामगार नोंदणीचे प्रमाणपत्र दिले जाते.यासाठी दलालांनी दुकाने थाटल्याची चर्चा आहेत.
*"बोगस कामगार नोंदणी."*
✴️या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार नसतानाही कामगार आहे अशी बोगस नोंदणी केली जात आहेत? योजनेचा लाभ घेण्यासाठी चांगल्या-चांगल्या धनदांडग्या घराण्यातील महिला व पुरुषांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली जात असल्याने खरे कामगार नोंदणी प्रक्रिये पासून अलिप्त राहात असल्याचे चित्र आहेत.गडचांदूर शहरात व आजुबाजूच्या गावाखेड्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात बोगस बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली व सुरू असल्याचे कळते? त्यामुळे खरे कामगार हा, शासनाच्या लाभापासून वंचित राहात आहे.संबंधीत विभाग, आर्थिक गुन्हे शाखा,पोलिसांनी गडचांदुरात कोणत्या ठिकाणी हे गैरप्रकार सुरू आहे,याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी.तसेच वरिष्ठांनी बोगस बांधकाम कामगार नोंदणी करून भ्रष्ट्राचार करणारे कर्मचारी तथा दलालाविरोधात कठोर कारवाई करून खऱ्या कामगार लाभार्थ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी नागरिकांकडून होत आहेत.आता या विषयी वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.








