संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
गडचिरोली:-राज्यभारत तीन मार्च रोजी मंगळवार व होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होळीच्या सणा मध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाण नेवैद्य म्हणून पुरणाची पोळी दिली जाते .एका बाजूला समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषण आणि गरिबी असताना अत्यंत पौष्टिक अन्न असलेली पुरणाची पोळी हि होळी मध्ये टाकण्या ऐवजी ज्यांना पुरण पोळी मिळू शकणार नाही अशा कुटुंबाना लोकांनी पोळी दान करून होळीचा सण साजरा करावा असे आवाहन महाराष्ट्र अनिस मार्फत रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारिणी सदस्य,चित्तरंजन चौरे, इंजि . गौतम पाटील,डॉ. प्रा. सुनील भगत,देवानंद बडगे,डॉ.विकास होले,विभुतीचंद्र गजभिये,चंद्रशेखर मेश्राम,उमेश चित्ते,देवयानी भगत,प्रा. पुष्पा घोडके,मंगला गाणार,विजयाताई ठाकरे,इंदू उमरे,वर्षा सहारे,व वर्षा टेंभेकर,शोभा गौतम पाटील, यांनी केले आहे
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे कि होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लाकूड तोड करून लाकडे जाळली जातात .त्या मधून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते . तसेच होळीच्या निम्मिताने वापरल्या जाणाऱ्या अपशाब्दातून अनेक ठिकाणी तंटे निर्माण होतात .ह्याला पर्याय म्हणून डॉ नरेंद्र दाभोकारांच्या कल्पक नेतृत्वातून साकारलेले पर्यावरण पूरक होळीचा उपक्रम वर्षे महाराष्ट्र अनिस गेली वीस वर्षे राज्यभर राबवत आहे.पर्यावरण पूरक होळी मध्ये लाकूड जळण्या ऐवजी आजूबाजूचा परिसर साफ करून गोळा केलेला कचरा जाळण्याचा एक पर्याय या निमित्ताने पुढे आलेला आहे तसेच समाजातील हिंसाचार , भ्रष्टाचार , व्यसन अंधश्रद्धा ह्या वाईट प्रवृत्तींचा पुतळा करून तो जाळण्याचा देखील एक पर्याय समाजात पुढे येताना दिसत आहे .पर्यावरण पूरक होळीला शालेय मुलांच्या मधून वाढता प्रतिसाद मिळत आहे.पर्यावरणाच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांनी पर्यवरण पूरक होळी साजरी करून त्याला पोळी दान करण्याची जोड द्यावी असे देखील आवाहन ह्या पत्रकात करण्यात आलेले आहे.
राज्यभरात अनेक ठिकाणी या निमित्ताने महाराष्ट्र अनिस च्या पुढाकाराने होळी लहान करा पोळी दान करा तसेच पर्यावरण पूरक होळी हे कार्यक्रम आयोजित केले आहेत .नागरिकांनी त्या मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अनिस तर्फे करण्यात आलेले आहे.








