संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
नागपूर:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर शहराच्या वतीन रिपब्लिकन कार्यकर्ता मेळावा रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजता एच के जी एन बँक्वेट हॉल पाटणकर चौक उत्तर नागपूर येथे संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन गोपालजी रायपुरे महाराष्ट्र प्रदेश सचिव यांनी केले तर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी कुंभे हे होते. विचार मंचावर मुख्य मार्गदर्शक म्हणून मा. रमेशजी जीवने ज्येष्ठ रिपब्लिकन विचारवंत , जनार्दन मून, डी एम बेलेकर,ईश्वरजी मेश्राम, जयंत टेंभुरकर,धीरज देशभ्रतार, डॉ. निलेश देशपांडे यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर शहर अध्यक्ष क्षितिज गायकवाड यांनी केले. बाबासाहेबांच्या मूळ राजकीय विचारांचा पक्ष हा फक्त आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हाच पक्ष आहे यावर भर देऊन पुढे पक्षाला अधिक बळकट कसे करता येईल यावर सर्व मान्यवरांनी आपले विचार मांडले.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असून या मूळ पक्षाला वाढवणे काळाची गरज आहे जोपर्यंत हा पक्ष जिवंत राहील तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे नाव व राजकीय विचार जिवंत राहील असे जीवने यांनी आपल्या भाषणात संगितले. त्यांनी असे प्रकर्षाने नमूद केले की बाबासाहेबांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही नुसती राजकीय चळवळ नसून एक विचारधारा आहे व ही भारतातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविणे ही काळा ची गरज आहे. रिपब्लिकन पक्ष ही आत्मसन्मानाची लढाई आहे असे विधान मेळाव्याचे उद्घाटक डॉ.गोपाल रायपूर यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन नागपूर शहर महासचिव रजत महेशगवली यांनी केले.या मेळाव्याला यशस्वी करण्या करिता सुरेश खोबरगडे, मनोज वासनिक, अश्वजीत गायकवाड, राहुल मेश्राम, वृषभ राऊत, सौरभ वाघमारे, ज्ञानदीप कुमार, शुभम वनकर, शुभम जांभुळकर, निखिल गायकवाड, मेघा वाघमारे यांच्या अथक परिश्रमाने पार पडला.









