✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-कोरपना तालुक्यातील वनसडी येथील १२ महिलांनी चंद्रपूर येथे उत्कृष्ट महिला मंच तर्फे आयोजित ‘गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड लावणी’ उपक्रमात उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून गावाचे नाव उज्ज्वल केले. पारंपरिक वेशभूषेत आणि तालबद्ध सादरीकरणातून या महिलांनी लावणीच्या ठेक्यावर प्रेक्षकांची मने जिंकली.

या उपक्रमात प्रीती पराग जकाते,
जोया शेख, साक्षी आस्वले
नवनीता कार ,ललिता गेडाम,सोनू आस्वले,वैशाली आस्वले,प्रियंका थेरे ,पोर्णिमा काकडे,धनश्री मडावी , विशू, अंबिका या महिलांचा समावेश होता.
महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा जपण्यासाठी आणि महिलांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमात तीन हजार हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये वनसडीच्या महिलांनी आत्मविश्वासाने सादरीकरण करत गावाचा मान उंचावला.
या यशाबद्दल गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी सर्व सहभागी महिलांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या व्यासपीठावर आपली कला सादर केल्यामुळे इतर महिलांनाही प्रेरणा मिळत आहे.त्यांना सचिन गोगले, सीमा गोगले ( गडचांदुर ) यांनी प्रशिक्षण दिले👇👇👇








