✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-आदर्श गाव स्वच्छ गाव सुंदर गाव असे नाना सन्मानाने गावाचं नाव नावाजलं होतं मात्र गेल्या पाच वर्षात आदर्श गावाला कलंकित व गावाची दुरावस्था निर्माण झाल्याचे चित्र गावात आहे गेल्या सहा महिन्यापासून नळ योजना बंद पडली आहे व्यायाम शाळा शारीरिक विकासाकरिता दहा लाख निधी खर्च करून साहित्य उपलब्ध झाले मात्र ग्रामपंचायतच्या दुर्लक्षपणामुळे संपूर्ण साहित्य धुळ खात पडले आहे तर गावामध्ये अनेक रस्त्यावर खड्डे पडले असून ठीक ठिकाणी सांडपाणी नाल्यामध्ये जमा आहे गावातीलअनेक समस्या गावकऱ्यासमोर असून पिपर्डा गावालासोडणार रस्ता अत्यंत खळी उघडल्यामुळे जाण्या येण्यासाठी वाटसरुणा त्रासदायक झालेला आहे यासाठी यापूर्वी बांधकाम राज्यमंत्री इन्द्रनिल नाईकयांनी संबंधित विभागाला उपरोक्त रस्त्याचे कामाला सिमेंट काँक्रीट रस्त्याला मंजुरी देण्यासाठी योग्य मार्गाने कारवाई करा असे निर्देश दिले मात्र या रस्त्यावर दोनदा डांबरीकरणाचे काम करण्यात आले मात्र हे रस्ता सिंचन क्षेत्रात असून ओलाव्यामुळे अनेक वेळा वाहतुकीने रस्ता खड्डेमय होत असल्याणे सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिदअली यांनी पालकमंत्री प्रा अशोकराव उईके आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे केली असून हा आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील गाव असल्याने औद्योगिक क्षेत्राच्या 15 किलोमीटर आतील क्षेत्रात असल्याने खनिज विकास निधी किंवा राज्य निधीमधून काचेरी रस्ता मंजूर करण्याची मागणी केली आहे







