संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-आरमोरी तालुक्यातील १० कि.मी अंतरावरील अंतरजी ( जोगी साखरा) येथे उद्या रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता शाक्यमुनी फॉरेस्ट मॅनेस्ट्री अंतरजी येथे भव्य बौद्ध धम्मपरिषदचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर बौध्द धम्मपरिषदेचे मुख्य मार्गदर्शक पुज्य भंदन्त विनयर क्खीता महाथेरो हे राहणार असुन मार्गदर्शक म्हणुन भन्ते प्रज्ञानंद महाथेरो पुज्य भिक्खू सचक महाथेरो भन्ते नंद थेरो भदंन्त शाक्यज्योती बुद्धगया भन्ते कशप्प औरंगाबादभदन्त महानाम सांवगी भदंन्त बुधज्योती चामोर्शी कुणालकिर्ती सांवगी भन्ते विनालाचंत ब्रम्हपुरी भिक्खू सोन पहाडी भन्ते सुमेरा सांवगी आदि सहीत ४० भिक्खू संघाची उपस्थिती लाभणार आहे.
तरी होवू घातलेल्या भव्य बौध्द धम्म परिषदेला बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक भिक्खू राहुलबोधी नागपूर व पुज्य भिक्खू सारीपुत यांनी केलेले आहे. अंतरजी गावात भव्य बुद्ध विहार उभारले जात आहे अंतरजी व जोगीसाखरा बौध्द बांधवाकडून भोजनदान दिल्या जाणार आहे.








