✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-१९८२ साली नव्याने झालेला गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र शासन व नक्षलवादी शासन चालाचले त्यावेळेसही आम्ही आदिवासी दुर्गम भागात ठेकेदारी चांगल्या प्रकारे केली आता नक्षलवाद संपुष्टात आलेला आहे. मार्च २०२६ पर्यत नक्षलवादी संपणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले.
सुरवातीच्या काळात कॅन्ट्राकदाराचे सुगीचे दिवश होते आता मात्र कॅन्ट्राकदारास काम मिळत नाही. सुरजागड कंपणीने छोट्या कॅन्ट्राकरारांचे कंबरडेच मोडले पेटी कॅन्ट्राकदार म्हणुन काम करा असे सांगण्यात येते.कॅन्ट्राकदारावर उपासमारीची वेळ आली आहे. काम केले तर अनुदान मिळत नाही. सहा – सहा महिने बिलासाठी वाट बघावी लागते. पूर्वी माझ्या 32 मशीने नक्षलवाद्यांनी जाळल्या तरीही आम्ही न घाबरता कामे केलेत आता नक्षलवादी संपृष्ठात आले असतांना मोठ – मोठ्या कंपन्यांना कामे दिल्या जातात मात्र लहान ठेकेदारांचे हाल झाले आहेत त्यामुळे कॅन्ट्राकदारांवर होत असलेला अन्याय मी शासन दरबारी मांडणार असल्याची माहीती कॅन्ट्राकदार संघटनेचे अध्यक्ष प्रणय खुणे यांनी दिली.
मी मानव विकास संघटनाचा नेता असुन हिच संघटना माझ्या समाज कार्यासाठी मोठी आहे मी जरी भाजपाचा जिल्हा उपाध्यक्ष असलो तरीही पक्षाचे कार्य अपेक्षा न ठेवता करत राहीन परंतु जिल्हयातील कॅट्राकदारांचा असलेल्या समश्या मुख्यमंत्रीकडे माडंणार असल्याची माहीती समाजसेवक प्रणय खुणे यांनी दिली.








