गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-१५ मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिनाचेऔचित्य साधून गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालय सभागृह येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासन शाखा गडचिरोली शिवाजी महाविद्यालय गडचिरोली, शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गोकुळनगर, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य मा. प्रतिभा पाटील यांचे अध्यक्षतेखाली जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य मा. माधुरी आटमांडे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.प्रमुख पाहुणे प्रवीण घाटे अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक परिषद गडचिरोली,चंद्रशेखर भडांगे अशासकीय सदस्य, मा. कमलेश तुमसरे, प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग गडचिरोली, मा. रुपचंद फुलझेले, वैध मापन अधिकारी गडचिरोली, शिवाजी शिक्षण संस्थेचे सहसचिव गोविंदराव बानबले, सदस्य शरद पाटील ब्राह्मणवाडे हे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्राचार्य अरुण मुनघाटे यांनी ग्राहकाची संकल्पना स्पष्ट केली. ग्राहक म्हणून ग्राहकांनी काय दक्षता घ्यायला पाहिजे ग्राहकाचे अधिकार काय आपली कुठेही फसवणूक झाली तर ग्राहकांनी न्याय मागण्यासाठी करावयाची कार्यपद्धती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कसे काम करते यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक, आयोगाचे प्रबंधक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी जनतेचा रोष पत्करून ग्राहकांना सेवा देणारे त्यांचे समाधान करणाऱ्या लोकसेवक तसेच समाजात कुठल्या तरी क्षेत्रात कार्यरत मान्यवर विद्युत विभागाचे विवेक परचाके,आकाश बावणे, दिनेश खारकर, दूरसंचार विभागाचे माकडे, एचपी गॅस सेवा देणारे सूर्यकांत करकाडे, रानभाज्याच्या जगात या संशोधन ग्रंथाच्या लेखिका संगीता ठलाल, प्रतिभा चौधरी,धनंजय पत्रे , रूपचंद फुलझेले,प्रवीण घाटे, संजय धकाते, चंद्रशेखर भडांगे, अरुण मुनघाटे, प्रफुल्ल बिजवे यांचा ग्राहक मित्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता शिवाजी महाविद्यालय गडचिरोली, शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली चे कर्मचारी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासन जिल्हा शाखा गडचिरोली चे पदाधिकारी, धनंजय पत्रे, रूपचंद फुलझेले प्रविण घाटे, प्राचार्य अरुण मुनघाटे यांनी सहकार्य केले.








