संपादक मुनिश्वर बोरकर RPI
गडचिरोली:-सचिन रामचंद्र को ल्लुरवार यांचा लांजेडा येथे अज्ञान ईसमानी दिवशा ढवळ्या खुण केल्यामुळे संविधान चौकात एकच खळबळ माजली.
विवेकानंदनगर , गडचिरोली येथील सचिन रामचंद्र कोल्लुरवार वय 32 वर्ष यांचा आज दिनांक १६ मार्च ला दुपारी एक वाजनाच्या दरम्यान लांजेडा येथे दिवशा ढवळ्या मर्डर झाला. सचिन हा संविधान चौकात पानटेला चालवित होता त्यांचा वैमा न्यासून किंवा पैशाच्या देवान घेवाणातून अज्ञान ईसमानी चाकु भोकसून मर्डर केला सदर बातमी विवेकानंद नगरात वार्यासारखी पसरली व एकच खळबळ माजली. गडचिरोली पोलीसांनी मर्म दर्ज करून प्रेत शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविले असुन खुणी कोण ? व किती होते याचा शोध गडचिरोली पोलीस घेत आहेत.
सचिनच्या मागे आईवडील पत्नी व एक मुलगी असुन कमवता मुलगा गेल्यामुळे कुल्लरवार कुंटुबियावर दुखाः चा डोंगरच पसरला असुन विवेकानंदनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.








